प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाने 2020-21 सालाकरिता घेतलेल्या बीएड् अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एसबीजी शिक्षण संस्थेच्या सागर बीएड् कॉलेजचा 100 टक्के निकाला लागला आहे. या परीक्षेमध्ये धनश्री गाडे हिने 90 टक्के गुण मिळविले असून कॉलेजमध्ये प्रथम आली आहे. पूजा इरकल हिने 89.7 टक्के गुण मिळविले असून द्वितीय क्रमांक तर सुनयना नाईक हिने 88.7 टक्के गुण मिळविले असून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. एकूण 76 विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळविले असून 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कार्यकारी, अध्यक्ष, प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.