पोलिसांकडून कठोर कारवाईचे संकेत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील साजिद ट्रेडर्स दुकान मालकाविरूद्ध सोशल माध्यमांवर गुरूवारी अफवा पसरवण्यात आल्याचे दिसून आल़े हे मसेज व्हायरल झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाल़ी लोकांमध्ये उलटसुलट चर्चाना ऊत आल्याने अखेर दुकानाचे मालक गणी कादर मुसानी (ऱा नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी अफवा पसरविणाऱयांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े
पवन रसाळ (ऱा रत्नागिरी), कोहीनूर ग्रीनवूडस सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व नवलाई मित्र मंडळ व्हॉटसअप ग्रृप यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मालकीचे मारूती मंदीर परिसरात साजिद ट्रेडर्स नावाचे दुकान आह़े गुरूवारी कोहीनूर ग्रीनवूडस या गृहनिर्माण संस्थेचे पत्रक सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होत़े यामध्ये तक्रारदार यांचे वडील दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात जावून आले आहेत़ त्यामुळे तक्रारदार यांच्या मालकीच्या साजिद ट्रेडर्स दुकानामध्ये खरेदी करून आलेल्या लोकांनी वैद्यकीय तपासणी करून घ्या, अशी सूचना करण्यात आली होत़ी
गणी यांनी आपल्या तक्रार अर्जात सांगितले आहे की, माझे वडील दिल्ली येथे मकरजच्या कार्यक्रमात गेलेले नाहीत़ आमच्या परिवाराबद्दल व साजिद ट्रेडर्स दुकानाबाबत अफवा सोशल माध्यमांवर पसरवल्या जात आहेत़ त्यामुळे नागरिकांमध्ये †िभतीचे वातावरण निर्माण करून आमच्या परिवाराबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत़ अशी तक्रार गणी यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आह़े शहर पोलिसांकडून चौकशी करून संबंधितांविरूद्ध भादवि कलम 499, 501 व 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला आह़े
अफवा पसरवल्यास गुन्हे
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांवर कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता मजकूर (पोस्ट) व्हायरल करण्यात येत आहेत़ विनाकारण गैरसमज पसरवणाऱया व समाजात भिती निर्माण होईल असे मेसेज शेअर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद ध्यावी