साटेली भेडशी / प्रतिनिधी:
साटेली भेडशी शाखा कार्यालय येथे विद्युत समस्येबाबत बुधवारी उपसरपंच गणपत डांगीसह ग्रामस्थ , व्यापारी बांधव यांना सोबत घेऊन घातलेल्या घेरावो नंतर तात्काळ समस्या दूर करून आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी पत्र वीज वितरण तालुका अभियंता अतुल पाटील यांनी दिल्यानंतर घेरावो मागे घेण्यात आला.
यावेळी ,उपसभापती सुनंदा धर्णे सरपंच लखू खरवत ,उपसरपंच गणपत डांगी,सरपंच सेवासंघ जिल्हा संघटक प्रविण गवस ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भिसे , प्रकाश कदम ,लक्ष्मी धर्णे , युवासेना तालुका समनव्यक मदन राणे ,व्यापारी प्रतिनिधी अनिल मोरजकर ,श्रीकांत केसरकर ,शिवदास मणेरकर ,नंदकिशोर टोपले ,आनंद टोपले ,प्रसाद गोलम ,हृषीकेश धर्णे ,जय भोसले ,न्हानजी राणे ,पिकुळे उपसरपंच आपा गवस ,ग्रामस्थ उदय बुडकुले , आनंद गवंडळकर ,पोलीस पाटील श्री कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
साटेली भेडशी गावात मागील काही दिवस विद्युत सेवा वारंवार खंडित होत असून रात्री अपरात्री विद्युत प्रवाह खंडित करणे.खंडित विद्युत प्रवाह तासनतास सुरळीत न करणे तर रोज त्या ठराविक वेळेलाच विद्युत खंडित करणे यामुळे ग्रामस्थ ,व्यापारी बांधव त्रस्त झाले होते.वीज वितरणाच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत ग्रामस्थ , व्यापारी बांधव यांना सोबत घेऊन उपसरपंच गणपत डांगी साटेली भेडशी शाखा कार्यालय उपअभियंता यांना बुधवारी घेरावो घातला.यावेळी वीज वितरणाच्या कारभाराबद्दल ग्रामस्थ व्यापारी यांनी आक्रमक होत पाढा वाचला.लखू खरवत ,गणपत डांगी ,प्रविण गवस ,अनिल मोरजकर ,संतोष भिसे आदींनी उपअभियंता श्री.बोरकर यांना धारेवर धरले व जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्यालयातुन हलणार नाही असा इशारा दिल्यानंतर तालुका अभियंता अतुल पाटील यांनी यशस्वी चर्चा करत आवश्यक मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले व घेरावो मागे घेण्यात आला.
या दिलेल्या लेखी पत्रात गेले पंधरा दिवस रात्रंदिवस सुरू असलेली स्ट्रीटलाईट दुरुस्ती तात्काळ करण्यात येईल ,साटेली भेडशी शाखा कार्यालयात पूर्णवेळ शाखा अभियंता पुढील आठवड्यात नेमणूक करण्यात येईल ,स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर व गावातील सर्व डीपी बदलून दुरुस्ती ची कामे करण्यात येतील , कामात कामचुकार व ग्रामस्थांची तक्रारी असलेल्या वायरमन ची बदली करण्यात येईल ,कंत्राटी वायरमन ऐवजी कायमस्वरूपी वायरमन देण्यात येईल असे लेखी पत्र तालुका अभियंता अतुल पाटील यांनी उपसरपंच गणपत डांगी यांना दिले.
बोल्ड-येत्या चार दिवसांत वीज वितरण शाखा कार्यालयात पूर्णवेळ उपअभियंता यांची नेमणूक केली जाईल तसेच लागलीच स्ट्रीट लाईटचा प्रश्न सोडविण्यात येईल असे लेखी पत्र तालुका वीज वितरण अभियंता अतुल पाटील यांनी दिले.