कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसनंतर साडेतीन महिन्यांत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. तो न घेतल्यास लाभार्थ्यांना ऍटीबॉडी टेस्ट करावी लागणार आहे. या टेस्टमध्ये ऍटीबॉडी कमी असल्यास पुन्हा पहिला डोस घ्यावा लागणार आहे. पुन्हा पहिला डोस घ्यावा लागणार असल्याने दुसऱया डोसनंतर पुनश्च हरीओम अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे शासनाने प्राधान्याने लस उपलब्ध करून तीन ते साडेतीन महिने पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना द्यावी, अशी मागणी वाढत आहे.
जिल्हÎात गेली सप्ताहभर लस न मिळाल्याने 150 लसीकरण केंद्रे बंद होती. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱयांकडून वारंवार विचारणा होत होती. यापुर्वी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 45 दिवसांनी घ्यावा, असे निर्देश होते. पण दोन महिन्यांपुर्वी हा कालावधी 84 दिवसांचा केला. या दरम्यान, मिळत असलेले डोस नवे व जुन्या लाभार्थ्यांना देण्यात येत होते. गर्दी टाळण्यासाठी मॅसेजद्वारे लाभार्थ्यांना केंद्रांवर बोलावले जात हेते. पण लसीचा तुटवडÎामुळे जूनच्या अखेरीस अनेक केंद्रे बंद राहिली. शेवटच्या 3 दिवसांत सर्वच केंदावर लस नसल्याचे फलक होते. त्यातूनच गुरूवारी संतप्त लाभार्थ्यानी अधिकाऱयांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे.
कोव्हीशिल्डच्या पहिला डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस देण्याचे निर्देश आहेत. एप्रिलमध्ये पहिला डोस घेतलेल्यांची गर्दी वाढत आहे. त्यातच लसीअभावी केंद्रे बंद असल्याने दुसरा डोस केव्हा मिळणार, याकडे लाभार्थ्याचे लक्ष आहे. पहिला डोस घेऊन साडेतीन महिने झाले, तरीही दुसरा डोस नाही, अशा लाभार्थ्यांकडून पुन्हा पहिला डोस घ्यावा लागणार का, असा प्रश्न केला जात आहे. थोडक्यात लसीसाठी पुनश्च हरीओम करावे लागण्याची शक्यता आहे.
जिल्हÎात जानेवारीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील हेल्थवर्कर्सचे पहिल्या डोसचे 100 टक्के तर दुसऱया डोसचे 61 टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. दुसऱया टप्प्यात प्रंटलाईन वर्कर्सपैकी दोन्ही डोस घेतलेले 93 टक्के आहेत. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय स्टाफ होता. दुसऱया टप्प्यात प्रंटलाइंंन वर्कर्संमध्ये पोलीस, होमगार्ड, महसुल अधिकारी, कर्मचारी होते. तिसऱया टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक, 45 ते 60 वयोगटातील व्याधीग्रस्त होते. चौथ्या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील सर्वाना आणि 1 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्याना लसीकरण सुरू आहे.
कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना सुरूवातीला 45 दिवस आणि त्यानंतर 84 दिवसांनी दुसऱया डोसचे निर्देश आले.त्यामुळे एप्रिलमध्ये पहिला डोस घेतलेल्यांपैकी अनेक जण आजही दुसऱया डोसच्या प्रतिक्षेत आहेत. कारण त्यांचे 90 दिवस उलटले आहेत. त्यांच्याकडून लसीची वारंवार चौकशी होत आहे. सप्ताहभर लस न मिळाल्याने सर्वच केंद्रांवर लस नसल्याचे फलक आहेत. त्यामुळे पहिल्या डोसनंतर 90 दिवस उलटलेल्या लाभार्थ्यांकडून विचारणा होत आहे.
कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 90 ते 112 दिवसांत घेणे अपेक्षित आहे. पहिल्या डोसनंतर साडेतीन ते चार महिने झालेल्यांना लस न मिळाल्यास ऍटीबॉडी टेस्ट करण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. या टेस्टमध्ये ऍटीबॉडीज कमी आल्यास तयार न झाल्यास पुन्हा त्यांना पहिला डोस घ्यावा लागणार आहे, अशी शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे.
उशीर झाला तरी दुसरा डोस घ्या : डॉ. फारूक देसाई
पहिला डोस घेऊन साडेतीन महिने उलटून गेलेल्यांत अनेक कारणे आहेत. यामध्ये आजारी असणे, गर्भवती असणे, पहिल्या डोसनंतर किरकोळ त्रास झाल्याने डोस न घेणे, संदेश देऊनही उशीरा येणे आदी कारणे आहेत. परंतु जरी उशीर झाला तरी लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी लस उपलब्ध होताच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी केले आहे.
ऍटीबॉडी टेस्टनंतर अन्य लस घेता येणे शक्य
90 ते 120 दिवसांत कोव्हिशिल्डचा दुसरा डोस न घेतल्यास लाभार्थ्यांतील ऍटीबॉडीज कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशांनी ऍटीबॉडी टेस्ट करावी. ती निगेटिव्ह आल्यास त्यांना कोव्हॅक्सिन, अन्य डोस घेता येणार आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यात उशीर झालेल्यांना आता पुनश्च हरीओम म्हणण्याची वेळ आली आहे.