पत्रादेवी येथे अबकारी विभागाची
पेडणे
पत्रादेवी चेक नाक्मयावर अबकारी विभागाने निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नेतृत्वाखाली पाच लाख 76 हजाराची रुपयांची दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त केले.
ही चोरटी दारु मोठय़ा टेंम्पोत भरून गोव्यातून पत्रादेवी मार्गे पनवेल महाराष्ट्र येथे जात होते. शनिवारी 17 रोजी पहाटे साडेचार वाजता हे वाहन पत्रादेवी अबकारी चेकनाक्मयावर पोचले असता त्यावेळी चालकाने आपली कागदपत्रे घेऊन नाक्मयावर आला असता त्यात खत असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, अबकारी अधिकाऱयांना संशय आल्याने या वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉयल ब्लू विस्की 180 लीटरच्या 38400 बाटल्या सापडल्या. त्यांची एकूण किंमत रु. 5 लाख 76 हजार होते. अवैध दारू घेऊन जाणाऱया वाहनचालकाला अबकारी अधिकाऱयांनी ताब्यात घेतले.
या धडक कारवाईत उपनिरीक्षक कृष्णा उसपकर, देविदास तिरोडकर, सुनील कार्बोटकर, दशरथ तारी, भगत पागी, रुपेश रेडकर व हरीश नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोरोना काळात ही पेडणे अबकारी कार्यालयाकडून तिसऱयांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मोठय़ा प्रमाणात चोरटी दारुची वाहतूक
पत्रादेवी चेक नाक्मयावरून अनेकवेळा चोरटी दारूचा व्यवहार चालू असतो. पत्रादेवी येथील चेकनाक्मयावर डय़ुटीवर असलेले अबकारी कर्मचारी आणि अधिकाऱयांच्या आशीवार्दामुळे हे सुरळीत चालल्याची चर्चा असून पंधरा दिवसांपूर्वी पत्रादेवीमार्गे मोठय़ा प्रमाणात नेण्यात आलेली अवैध दारू महाराष्ट्रात तेथील पोलिसांकडून पकडली जाते. मात्र या दारुच्या गाडय़ा पत्रादेवी चेकनाक्मयावरून सहिसलामात चालक घेऊन जातात. त्यामुळे अवैध दारू वाहतुकीला पेडणे अबकारी अधिकारी आणि चेकनाक्मयावर डय़ुटी बजावत असलेल्या कर्मचाऱयांचेच आशीर्वाद असल्याची चर्चा आहे.