नागझर कुर्टी येथील घटना : तोतया अधिकारी भासवून, फ्लॅटात डांबून दिवसाढवळय़ाचे चोरीचे धाडस
प्रतिनिधी / फोंडा
नागामशिद-कुर्टी, फोंडा येथे आरोग्य अधिकारी असल्याचे भासवून घरमालकांना बेडरूममध्ये डांबून केलेल्या साडेसहा लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी छडा लावण्यात फोंडा पोलिसांना अखेर यश आले आहे. याप्रकरणी संशयित महिलेला काल बुधवारी अटक करण्यात आली आहे. रत्नमाला चंद्रशेखर ओगुरू (38, मूळ आध्रा प्र. रा.झिंगडीमळ कुर्टी) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून रू. सहा लाख किमतीचे दागिने व सुमारे रू. 19 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर घटना 8 सप्टें. रोजी दिवसढवळया सायं. 4.30 वा. घडली होती.
नागामशिद-कुर्टी येथील सुजिता सुधाकर दारसी या महिलेने फ्लॅटात चोरटय़ांने आरोग्य अधिकारी असल्याचे सांगून दिवसाढवळया दागिने व रोखडसह सुमारे साडेसहा लाखाच्या ऐवज लांबविल्याची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. सदर कृत्य करताना चोरटय़ांनी घरातील माणसांना बेडरूममध्ये लॉकडाऊन करून सोनसाखळया, गोल्ड नॅकलेस, कर्णफुले, अंगठयासह सुमारे 175 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रू. 38,000 रक्कमेसह पसार झाली होती.
तोतया अधिकारी भासवून चोरी
नागामशिद कुर्टी येथील रादीया युसुफ इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुजिता राहत असून सदर प्रकारावेळी फ्लॅटमध्ये सुजिता, तिचा मुलगा व नडण होती. एका अज्ञात महिलेने घराची बेल वाजवून आपण आरोग्यअधिकारी असल्याचे ओळख सांगून फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवला होती. त्यानंतर सुजिताकडे काही कागदपत्राची मागणी केली होती. सुजिता कागदपत्रांच्या मागणीनुसार बेडरूममध्ये दाखल झाल्यानंतर तिला बाहेरून कडी घालताना तिचा मुलागाही तिच्यासोबत बेडरूममध्य़े अडकला. सुजिताची नणंद सरस्वती हिला वॉशरूममध्य कडीबंद केले. त्य़ानंतर चोरटय़ा महिलेने कपाटातील सर्व दागिने व रोकड लांबवून येथून पसार झाली होती.
फोंडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या
कोरोनाकाळात तोंड बांधून आलेली महिला चोरीच्य उद्देशानेच आली होती. प्राथमिक तपासात ती तक्रारदारांच्या ओळखीचीच असल्याची माहिती प्राप्त झाली असून ती यापुर्वीही या ठिकाणी येऊन सविस्तर रेखी करून गेली होती. फ्लॅटातील सर्व इसम मूळगावी परतल्याची पक्की माहिती तिला होती. त्यानुसार स्वत: बेत आखत चोरीचे धाडस केले होते. मात्र एका फायनान्स कंपनीकडे केलेल्या देवाणघेवाण प्रकरणी संशयाची सुरी तिच्याकडे गेल्याने चोरीचा छडा लागला. त्यानुसार तीला सापळा रचून ताब्यात घेतल्यानंतर चोरीची कबूली दिली आहे. संशयिताकडून दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित महिलेला भा.दं.सं. 392 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
उपअधिक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या टिमचे तपास अधिकारी उपनिरीक्षक आदित्य वेळीप, नितेश काणकोणकर, रश्मी भाईडकर, सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद गावडे, हवालदार केदारनाथ जल्मी, समीर पाटील, कॉन्स्टेबल अमेय गोसावी, गोरेश भारतू व मयूर जांबोलकर यांनी ही कारवाई केली. द. गोवा अधिक्षक पंकजकुमार सिंग यांनी पोलीस स्थानकात भेट देऊन सर्व टिमचे अभिनंदन केले.
निरीक्षक हरिष मडकईकर यांचा आनंद द्विगुणीत
फोंडा पोलीस स्थानकात निरीक्षक म्हणून सेवा बजावत असलेले हरिष मडकईकर यांच्या टिमने चोरीचा छडा लावून तोतया अधिकारी महिलेच्या मुसक्या आवळल्या. नेमक्या त्याच दिवशी सायंकाळी उपअधिक्षकपदी बढतीची आर्डर पक्की झाल्य़ाने त्याचा आनंद द्विगुणीत झाला. ते मागील तीस वर्षापासून पोलीस सेवेत असून पंधराहून जास्त पोलीस स्थानकात सेवा बजावली आहे.