केरळमधील पुष्पलता नामक एका परिचारिकेने विश्वविक्रम स्थापित केला आहे. तिने 15 ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्यदिनी चेंगनूर या गावी जिल्हा रुग्णालयात सलग साडेसात तासात 893 लोकांचे लसीकरण केले. या विक्रमाबद्दल गेल्या मंगळवारी केरळच्या सरकारकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. पुष्पलता यांनी विनम्रपणे हा सन्मान स्वीकारताना आपल्या विक्रमाचे श्रेय आपल्या सहकाऱयांना दिले. हे लसीकरण आपण एकटीने केले नसून आपले सर्व साहाय्यक त्यासाठी कारणीभूत असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. पुष्पलता यांची कर्तव्यनि÷ा सर्व कोरोनायोद्धय़ांसाठी आदर्श आणि अनुकरणीय आहे, अशी प्रशंसा मान्यवर डॉक्टरांनीही केली आहे.
पुष्पलता या परिचारिका बनण्यापूर्वी गायिका होत्या. विवाहानंतर त्यांनी आपल्या सासरच्या मंडळींकडून स्फूर्ती घेऊन नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. आता त्यांनी पूर्ण वेळ हाच व्यवसाय स्वीकारला आहे. आपले काम त्या अत्यंत नि÷sने आणि सर्वस्व झोकून देऊन करतात, असा त्यांच्या वरि÷ांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोरोना लसीकरणाचे उत्तरदायित्व मोठय़ा प्रमाणात सोपविण्यात आले आहे. या पुढच्या काळात कोरोनावर पूर्णतः नियंत्रण मिळेपर्यंत आपण लसीकरणाचे कार्य आता इतक्मयाच एकाग्रतेने आणि नि÷sने करत राहू, असे पुष्पलता म्हणतात.