वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील तरुणावर फिरस्त्या परप्रांतीयांनी हल्ला करून पलायन केले या हल्लेखोरांना शोधन्याचे कोडोली पोलीसापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
गेली काही दिवस सातवे परिसरात अनोळखी परप्रांतीय व्यक्ती घरोघरी जावून आयुर्वेदिक ओषध विक्रिच्या बहाण्याने नागरिकांना गुंगिचे औषध देवून व स्प्रे फवारुन नागरिकांना लुबाडतात व नंतर त्याचे नंबर घेवून ब्लँकमेल करून पैशाची मागणी करतात.असे प्रकार सातवे, मोहरे, सावर्डे येथे गेली पाच ते सहा दिवस घडत होते. काल दि.६ रोजी हा प्रकार सातवेतील युवक विकास पाटील यांच्या लक्ष्यात आल्यावर त्याने अनोळखी या पापांतीय व्यक्तीस फोन करून बोलवून घेवून साफळा रचला. त्याची त्यांना कुनकुन लागली व झटापट करून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सातवे व सावर्डे येथील युवक अतुल काटे व मनोज बच्चे व दोन्ही गावातील नागरिकांनी सातवे ते बोरपाडळे मार्गावर फिल्मी स्टाईल पाठलाग केला. यावेळी या परप्रातींच व्यक्तीनी बॉटल व पाईप फेकून मारल्याने विकास पाटील यांनी बोरपाडळे येथे त्याची गाडी स्लीप होवून पडल्याने तो कीरकोळ जखमी झाले. व त्या संधीचा फायदा घेवून परप्रांतीय व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले.
दरम्यान यातील विकास पाटील यानी पोलीस ठाण्यात येवून झालेल्या प्रकाराबाबत पोलीसांना तक्रार अर्ज दाखल केला त्यामध्ये परप्रांतीय व्यक्तीचे मोबाईल नंबर दिले होते कोडोली पोलीस सदर नंबरवर संपर्क करतात ते परप्रांतीय फोनच उचलत नसल्याने त्यांना शोध न्याचे आव्हान कोडोली पोलीसा पुढे उभे राहिले आहे.
ओळखपत्र पाहूनच फिरस्त्यांना गावात प्रवेश द्यावा
ग्रामपंचायतीने बाहेरून येणाऱ्या फिरस्ती लोकांवर ओळखपत्र बघुन सर्व माहिती घेवून फिरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत असलीतरी ग्रामस्थानी देखील फिरस्त्या अनोळखी व्यक्तींना थारा देवू नये अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत.