कोल्हापूर / प्रतिनिधी
सातवे ता. पन्हाळा येथील प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणाच्या खून प्रकरणी दोषी धरून कोडोली ता. पन्हाळा पोलीस ठाण्याचे सपोनि दिनेश काशीद याचे निलंबन करण्याची मागणी नातेवाईकासह ग्रामस्थांनी पोलीस अधिक्षकाकडे निवेदना द्वारे आज केली आहे.
सातवेतीलल शिवतेज उर्फ मोन्या विनायक घाटगे या महाविद्यालयीन युवकाचा प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत शुक्रवार दि. ९ रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी राजकीय दबावाखाली कामात कसूर केल्याने शिवतेजचा मृत्यू झाला. असा गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून निलंबनाची मागणी केली असून तातडीने कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा निवेदनात दिला आहे.
शिवतेज घाटगे आणि या मारहाणीतील संबंधित कुटूंबातील मुलगी सहा महिन्या पूर्वी पळून गेले होते. त्यावेळी या बाबत कोडोली पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी राजकीय दबावाखाली हे प्रेम प्रकरण मिटवले होते. तरीही मुलीकडील नातेवाईकाकडून खुन्नस होती. तसेच दरम्यानच्या काळात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी मृत व्यक्तीस आणि कुटूंबास मृत शिवतेज यास पोलीस ठाण्यामध्ये बोलावून मारहाण तसेच वारंवार धमक्या त्रास देण सुरू होते. व शिवतेज याच्या आईला पण त्रास दिला होता. असा आरोप देखील करण्यात आला आहे.
शिवतेज उर्फ मोन्या विनायक घाटगे याचा टेंपो असून दिपक यशवंत हांडे यांनी विकलेली म्हैस फकिरवाडी येथे सोडणेकरीता बुधवारी सायंकाळी हे दोघे जात असताना मांगले (ता. बत्तीस शिराळा) गावच्या हद्दीत बुधवारी रात्री धनटेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आरोपीने टू व्हीलर गाडीवरून येऊन टेंपो अडवून लाकडी दांडक्याने मारून गंभीर स्वरूपाची मारहाण करून विवस्त्र अवस्थेत शेतात फेकून देऊन संशियत आरोपी पसार झाले होते.
या प्रकारानंतर गंभीर जखमी शिवतेज यास कोडोली पोलिसात आणले होते त्यावेळी तो बोलत होता पण त्याची फिर्याद आणि जबाब घेण्यास टोलवा-टोलवी उडवाउडवीचे उत्तरे सपोनि काशिद यानी दिली होती. यामुळे त्यांना कामात कसूर केल्या बद्दल तातडीने निलंबित करावे, वेळी कारवाई करावी