प्रतिनिधी / वारणानगर
सातवे ता.पन्हाळा येथील बसस्थानका जवळ राहणाऱ्या सोहेल बाबासाहाब हवालदार वय वर्ष १८ या तरूणाचा घरातील छताच्या पंख्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला दुपारी ३ वा. च्या सुमारास ही घटना घडली. सोहेल हा सातवे यथे बसस्थानकाजवळ राहणारे त्याचे मामा शरीफ दिलावर मुजावर यांच्या घरी राहायला होता. तर त्याचे आई वडील गोवा येथे वास्तव्यास राहायला आहेत. सोहेल हवालदार घरी छताचा पंखा दुरुस्त करत असताना त्यांच्या हाताला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याची आजी घरी होती तिने सोहेलला शॉक लागलेला पाहून आरडा ओरड करून मदतीला लोक जमवले.
सोहेल याचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सद्या तो घरीच असायचा. तर त्याचे मामा कोडोली ता.पन्हाळा येथिल पोखले फाटा येथे घराचे बांधकाम सुरू आहे. ते पाहायला गेले होते. याबाबतची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून सोहेलच्या मृत्यू ने गावात हळहळ व्यक्त होत आहे.