अपघातील तरुणाच्या बळीनंतर ग्रामस्थ आक्रमक
वारणानगर / प्रतिनिधी
सातवे ता.पन्हाळा येथील प्रमुख मार्गावर व चौकात सीसीटीव्ही लावण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून तीन लाख रूपये मंजूर असल्याचे माजी उपसरपंच माणिक पाटील यानी सांगीतले. सातवे ता. पन्हाळा येथे दि.७ डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास सुनिल रघुनाथ पाटील वय ३० या तरुणाचा मोटर सायकल घसरल्याने खडीवर पडून जागीच मृत्यू झाला होता.
रात्रीच्या वेळी या मार्गावर कोण नसल्याने अपघाताचे कारण नक्की स्पष्ट झालेले नाही. दरम्यान या अपघातावेळी भरधाव वेगाने एक चारचाकी वहान गेल्याने त्या वहानाला साईड करताना हा अपघात झाला असावा गावात सिसीटीव्ही कॅमेरे असते तर अपघातातील कारण स्पष्ट झाले. असते यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झाल्याने सातवेसह परिसरातीत गावात मुख्य मार्गावर दळण वळण वाढले आहे. रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी प्रारंभ झाला होता. तथापी हे काम थांबले होते. त्यामूळे यासाठी आणलेली खडी रस्त्याकडेला तशीच पडून आहे. गळीत हंगामासाठी ऊसाची वहाणे सुरू झालेवर सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबधीत अधिकारी यांना रस्त्याकडेला टाकलेल्या खडीचे ढीग काढणेस ग्रामस्थांनी कळवले होते. तरी देखील खडीचे ढीग काढलेले नाहीत अशातच या खडीच्या ढिगामुळे एका नवीनच दीड महिण्यापूर्वी विवाह झालेल्या व कुंटूबात एकूलता एक असलेला तरूण सुनिलचा अपघाती मृत्यू झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत आहेत.
या संदर्भाने माजी उपसरपंच माणिक पाटील यांना विचारले असता अपघातात तरूण सुनिल पाटील याचा झालेला मृत्यू चटका लावणारा आहे. यातील दोषीवर कारवाई व्हावी यासाठी सर्वच ग्रामस्थ आग्रही आसून ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळाचा कार्यकाल संपण्यापूर्वी १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही साठी ३ लाख रू. तरतूद केली आहे. तथापि हा निधी लवकर उपलब्ध झाला नसल्याने हे काम अपूर्ण राहिले निवडणूक झाल्यानतंर सीसीटीव्हीचे काम पूर्ण होईल असे सांगीतले.