उत्साहात, आनंदात नवीन वर्षाचे स्वागत, सर्व हॉटेल्स फुल्ल
प्रतिनिधी/ सातारा
हॅपी न्यू ईयर म्हणत सातारकारांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्ष 2022 चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. येणार सर्व वर्ष आनंदात, उत्साहात, आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना ही करण्यात येत होती. कारण मागील वर्षी म्हणजे 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. आणि त्यामुळे लॉकडाऊनचा सामना सर्वांनाच कारावा लागला होता. अनेकांचे रोजगार ही बुडाले होते, त्यामुळे येणाऱया सर्वच वर्षात कोणतीच रोगराई फैलू नये अशी आशा ही करण्यात येत होती. विशेष म्हणजे रात्री अगदी 12 च्या सुमारास एकमेकांना शुभेच्छा देण्यात येत होत्या.
त्यातच राज्य शासनाच्या दि. 30 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सातारा जिल्हय़ाकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 01 जानेवारी 2022 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत विविध आदेश जारी केले आहेत. यामध्ये कोणत्याही सोहळय़ास 50 व्यक्तींपर्यंत मर्यादा, तसेच आतषबाजी करण्यावरही बंदी करण्यात आली होती.
त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडु नये याकरीता पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदांबस्तही करण्यात आला होता. या दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे संशयितांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत शहरासह उपविभागात ही पोलिस बंदोबस्त अधिक प्रमाणात होता.
हॉटेल्समध्ये गर्दीच गर्दी
शुक्रवारी सायंकाळी शहर परिसरातील सर्वच हॉटेल्स ग्राहकांनी फुल्ल झाले होते. अनेक हॉटेल व्यावसायिक तर अगदी आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. कारण या दिवशी ग्राहकांची हॉटेल्सला एकच गर्दी असते. त्यामुळे अनेक हॉटेल चालकांनी ग्राहकांची कोणतीच गैरसोय होऊ नये याची खबरदारी ही तितकीच घेण्यात येत होती. अनेकांनी मित्र मैत्रिणींसोबत तर काहींनी आपल्या कुटुंबियांसोबत जेवणाचा बेत आखला होता.
शुभेच्छांचा वर्षाव
नुतन वर्षाच्या स्वागतानिमित्त वॉटसऍप, फेसबुक, ट्वीटर आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा देण्यात येत होते. काहींनी तर कविता बनवुन तर काहींनी शेरो, शायरी च्या अनोख्या अंदाजात तर अनेकांनी आपल्याला आलेले संदेश पुढे पाठवत आपल्या मित्र परिवारांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. अनेकांनी केक कापुन ही नववर्षाचे स्वागत केले.
विविध संकल्प
अनेका नागरिकांनी येत्या नुतन वर्षात आपापल्या जीवनात काही तरी नविन करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये नियमित व्यायाम, मोबाईलचा कमी वापर, येत्या वर्षी आपल्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करायचे, आपल्यामुळे कोणाला वाईट वाटुन नये अशा प्रकारची वागणुक न करणे, विद्यार्थ्यांनी येत्या वर्षी मागील वर्षी पेक्षा अधिक गुण मिळविणार आदीं प्रकारचे विविध संकल्प ही करण्यात येत होते.