प्रतिनिधी / सातारा
सातारा पोलीस दलात मोटार वाहन विभागात कार्यरत असलेल्या संतोष मारुती दळवी यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने रात्री मृत्यू झाला. त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. हे पोलीस मोटार परिवहन विभागात मेकॅनिक पदावर कार्यरत होते.
वाई, रहिमतपूर नंतर मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत 3 पोलिसांच्या मृत्यूने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.