प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात देशातील पहिली सैनिक स्कूल आहे. यापुर्वी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास टॅलेंटला महत्व दिले जात होते. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून खुप मेहनत घेत होते. आता मात्र, सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरक्षण असल्याने जे विद्यार्थी खरोखर वंचित राहत होते. त्यांना याचा लाभ मिळणार आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 27 टक्के आरक्षण लागू आहे. दरम्यान, प्रवेश सुरु झाला आहे.
सैनिकात अधिकारी आपला मुलगा व्हावा यासाठी पालकवर्ग आर्वजून सैनिक स्कूल साताऱयात प्रवेश मिळवण्यासाठी धडपडत असतात. खूप परिश्रम विद्यार्थी व पालक घेत असतात. काहीही करुन प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी विविध क्लासेस लावत असतात. आपली हुशारी दाखवून असलेल्या प्रवेश परीक्षेत यश मिळवत असतात. साताऱयाच्या सैनिक स्कूलला परंपरा आहे. देशातले पहिली सैनिक स्कूल आहे. या सैनिकी स्कूलमधील अनेक अधिकारी नौदल, वायदुल आणि सैन्यदलात उच्च पदावर काम केलेले आहे. भारत पाक, भारत चीन या युद्धातही येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक विद्यार्थी हुतात्मा झाले आहेत. काही विद्यार्थी हे उच्च पदावर आहेत. असा ज्वाज्वल्य इतिहास असलेल्या या सैनिकी स्कूलने विद्यार्थी घडवले आहेत. नुकतीच प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे.
या प्रवेश प्रक्रियेत केंद्र शासनाकडूनच आलेल्या निर्णयानुसार सैनिक स्कूल प्रशासनाने आरक्षण ठेवले आहे. सहावी आणि नववीला प्रवेश सुरु आहे. अनुसूचित जातीला 15टक्के, अनुसूचित जमाती 7.5 टक्के, 27 टक्के ओबीसी, उरलेल्या जागापैकी 67 जागा महाराष्ट्रासाठी इतर जागा इतर राज्यांसाठी आणि 10 टक्के महिला, 25 टक्के आजीमाजी विद्यार्थी, 26 टक्के सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वेबसाईटवर माहिती दिली आहे, असे सैनिक स्कूल प्रशासनाने माहिती दिली.