प्रतिनिधी/सातारा
सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या एक व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या दहा अशा एकूण अकरा अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच काल, शनिवारी (दि. 11) कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तेरा व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे पाच असे अठरा नागरिकांना कोविड-19 अनुमानित रुग्ण म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व अठरा जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.