सातारा / प्रतिनिधी :
कोरोना काळात काम करणारे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी व नगरपालिकेचे सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना शासनाने काढलेल्या प्रोत्साहन भत्याचे परिपत्रक हे दिशाभूल करणारे आहे. ते रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने केले. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.