ऑनलाईन टीम / सातारा :
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या सातारा जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
संग्राम शिर्के (वय 26, रा. किडगाव, ता. सातारा) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिर्के यांच्या वडिलांनी भुईंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्के हे वाई पोलीस उपविभागीय कार्यालयात कर्तव्यावर होते. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रायगाव फाटा (ता.जावली) हद्दीत पुणे-बेंगळूर महामार्गावर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या शिर्के यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.