शाहूपुरी : सातारा येथील आघाडीचे रंगकर्मी अतुल कुलकर्णी, अमित तांबे उर्फ सोनू आणि अभय देवरे या कलावंतांना शाहू कलामंदिर येथे आयोजित शोकसभेत जिल्ह्यातील सर्व रंगकर्मीच्यावतीने
श्रध्दांजली वाहण्यात आली.
कलावंतांच्या आकस्मित जाण्याने सातारच्या रंगभूमीचे फार मोठे नुकसान झाले. हे तिन्ही कलावंत आपापल्या क्षेत्रात अत्यंत उत्तम काम करत होते. अभय देवरे, सोनू तांबे, अतुल कुलकर्णी यांच्या निधनाने निर्माण झालेली रंगभूमीवरची पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे. त्याच्यासोबत निर्माता मधुकर देशपांडे, कमल ठोके, प्रसाद नारकर यांच्या आई आणि रंगकर्मी प्रशांत इंगवले यांचे वडील यांचेही या काळात निधन झाले. या सर्वांना रंगकर्मीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
कल्याण राक्षे यांनी प्रास्तविक केले. संतोष पाटील, राजीव मुळे, दीपक देशमुख, शेखर कुलकर्णी, जगदीश पवार, महेश देशपांडे, नीरज कलढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळकृष्ण शिंदे यांनी आभार
मानले. यावेळी रविना गोगावले, सिद्धी कोल्हापुरे, पुष्पा कदम, कल्याण राक्षे , प्रसाद नारकर, संतोष पाटील, मकरंद गोसावी, शेखर कुलकर्णी, दीपक देशमुख, अक्षय सावंत उपस्थित होते.