प्रहार अपंग क्रांती आंदोलनकडून तहसीलदार आशा होळकर यांना केली होती विनंती
तहसीलदार आशा होळकर यांच्या सहकार्याने रेशन कार्ड मिळाल्याने सुरू झाले औषध उपचार
सातारा / प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील निगडी येथील निराधार दिव्यांग असलेल्या दिनकर विश्वास बोभाटे यांच्या पायाला जखम झाली आहे.ती जखम घेऊन ते दिवस ढकलत होते. त्यांना दवाखान्यात न्यायला सुद्धा त्यांच्याजवळचे कोणी नातेवाईक नव्हते.प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या कार्यकर्त्यां ही बाब समजली.त्यांच्यावर उपचार करायचे असल्यास रेशन कार्ड गरजेचे असल्याचे निदर्शनास येताच प्रहारचे आनंदा पोतेकर यांनी तहसीलदार आशा होळकर यांच्याकडे विनंती केली अन लगेच एका दिवसात रेशन कार्ड देण्यात आले.आज बोभाटे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निगडी तालुका सातारा येथील दिनकर बोभाटे हे दिव्यांग व निराधार आहेत. त्यांना बघणारे असे जवळचे कोणीच नाही. त्यात त्यांना पायाला लागले आहे. सध्या जिल्हा रुग्णालय सातारा येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना उपचारा दरम्यान रेशन कार्डची आवश्कता होती तसेच त्यांना शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्डची गरज भासत होती. परंतु त्याच्याकडे रेशन कार्ड नसल्याने या सर्वामध्ये अडचणी येत होत्या. प्रहारचे तालुका अध्यक्ष आनंदा पोतेकर यांनी सदर व्यक्तीला रेशन कार्ड मिळावे अशी विनंती तहसीलदार आशा होळकर यांना केली. तहसीलदार होळकर यांनी रेशन कार्ड मागणी अर्ज सादर करण्यास सांगून तालुका पुरवठा निरिक्षक संतोष दळवी यांना तात्काळ कार्ड द्या अशा सुचना दिली संतोष दळवी यांनीही लगचेच राशन कार्ड तयार करून दिले. याबदल तहसीलदार सातारा व तालुका पुरवठा निरिक्षक यांच्या सहकार्यबदल आनंदा पोतेकर यांनी आभार मानले.रेशन कार्ड मिळाल्यामुळे बोभाटे यांना औषध उपचार व शासकिय योजनाचा लाभ घेण्यासाठी नक्कीच उपयोग होईल, अशी माहिती पोतेकर यांनी दिली.