अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 24 एप्रिल 21, सकाळी 11.10
●जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 37.20 ●प्रमुख शहरात कोरोनाचा वेगाने स्प्रेड ●सातारा, कराड, वाई, फलटण, पाटणमध्ये भीतीदायक वातावरण ●जिल्हा बाहेर जायला परवाना आवश्यक ●गावागावात कोरोनाने उडवली झोप ●शुक्रवारी दिवसभरात 5379 जणाचे स्वाब तपासले
सातारा / प्रतिनिधी :
अवघा सातारा जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दररोज आढळून येणाऱ्या बाधितांची संख्या धडकी भरवत आहे. गेल्या महिनाभरामध्ये सगळ्यात जास्त बाधित होण्याची संख्या शुक्रवारी झाली आहे. एका दिवसात सातारा जिल्ह्यात आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक करत 2001 जण बाधित नव्याने झालेले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शहरे बाधित होण्याचे प्रमाण मोठे असून प्रमुख शहरात कोरोनाचा स्प्रेड दुप्पट तिप्पट वेगाने सुरू आहे. सातारा, कराड, वाई, फलटण, पाटण या शहरात भीतीदायक वातावरण कोरोनामुळे बनले आहे. छोट्या छोट्या गावात कोरोनाने लोकांची झोप उडवली आहे. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात फिरायला इथे मनाई आहे पण काहीजणाना जिल्ह्याबाहेर जायची जिल्ह्यात यायची खूप घाई असते.अशा लोकांना शासकीय परवाना घेणे बंधनकारक बनले आहे.
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. काल शुक्रवारी रात्रीच्या आलेल्या अहवालात तब्बल 2001 जण बाधित झालेले आहेत. त्यामुळे जिल्हा वासियांची झोप उडवली असून आत्तापर्यंतच्या या महिन्यात बाधित होण्याच्या संख्येत रेकॉर्ड केलेले आहे. प्रमुख शहरात तर कोरोना बाधित होण्याच्या प्रमाण दुप्पट तिप्पट होत आहे.सातारा शहर पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात अडकू लागले आहे.शहरातील गोडोली, सदरबाजार या भागाला कोरोनाच्या तावडीतुन सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी नागरिकच नियम पाळत नव्हते.त्यामुळे स्प्रेड ही थांबता थांबेना अशी स्थिती बनली आहे.
प्रमुख शहरे कोरोनाच्या कचाट्यात
जिल्ह्यातील प्रमूख शहरामध्ये कोरोना बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हा स्प्रेड थांबवण्यासाठी त्या त्या शहरातील प्रशासन प्रयत्न करत आहे.परंतु कोरोना उद्रेक मोठा असल्याने प्रशासनाने अक्षरशः गुडगे टेकले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने सातारा, कराड,वाई, फलटण, पाटण या शहरांमध्ये वातावरण भीतीदायक बनले आहे.दररोज बाधित होण्याचे प्रमाण पाहता धडकी भरत आहे.
गावागावात उडवली झोप
जिल्ह्यातील मोठमोठ्या गावाबरोबर छोट्या वाड्यावस्तीवर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.गावाकडे कसला आलाय कोरोना म्हणणारे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.त्यामुळे गावागावात बाधित संख्या पहाता प्रत्येकाची झोप उडवली असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारचा पॉझिटिव्हिटी रेट वाढता
शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यातील 5379 जणांच्या स्वाब तपासणी करण्यात आली.त्यामध्ये 2001 जण कोरोनाच्या विळख्यात नव्यानं सापडले आहेत.पॉझिटिव्हिटी रेट 37.20एवढा झाला आहे.डी. एच.सातारा मार्फत 1728 जणांचे स्वाब घेण्यात आले.त्यामध्ये 517 जण बाधित आढळून आले.के.आय.एम.एसमध्ये 151 जणांची टेस्ट केली त्यात 60 जण बाधित आढळून आले.खाजगीमध्ये 357 जणांचे स्वाब घेतले त्यात 98 जण बाधित आले.2236 जणांचे आरटी पीसीआर तपासणी केली त्यात 675 जण बाधित सापडले आर.ए.टी. मध्ये 3 हजार141 जणांचे स्वाब तपासणी केली त्यात 1326 जण बाधित आले.
वाई तालुक्यात शुक्रवारी बावधनच्या पुढे जांभळी
वाई तालुक्यातील बाधित आढळून येण्याचे प्रमाण वाढते आहे.एकटे बावधन गाव बाधित होण्यामध्ये पुढे आहेच पण शुक्रवारी जांभळी या गावातील तब्बल 18 जण कोरोना बाधित तर बावधन 17, पसरणी 10 या मोठ्या गावातील मोठे आकडे असून एकट्या वाई शहरात तब्बल 43 जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. वाई तालुक्यातील शुक्रवारी दिवसभराचा आलेल्या अहवालात 195 जण बाधित आढळुन आले तर 712 जणांचे स्वब तपासणी केले.