वाई / प्रतिनिधी :
ओझर्डे (ता.वाई) येथील हेमंत दामोदर सोनावणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रविवार पेठेतील महिलेवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई पोलीस ठाण्यात सीमा हेमंत सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हेमंत यांनी दि.31 रोजी धावली गावच्या परिसरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. हेमंत यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येस सर्वस्वी जबाबदार पूनम वैराट आहे. सीमा मला माफ कर. मुलांची काळजी घे. नाना-नानी यांची काळजी घे, असे लिहले असून, हेमंत यांना सतत लग्न करण्यासाठी तगादा लावणाऱ्या महिलेवर भा. द.वि. स.306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.