प्रतिनिधी / लोणंद
आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील राजकुंवर तुकाराम नलावडे याच्या बंगल्यामध्ये असणाऱ्या बेडरुमचा दरवाज्याचा कडीकोयंडा कटावणीच्या साह्याने तोडुन मंगळवारी रात्री अज्ञात चोरटयांनी गोदरेजच्या कपाटातुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५६ हजार रुपये असा एकुण २ लाख ७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली अधिक माहिती अशी की आदर्की बुद्रुक ता फलटण येथील राजकुंवर तुकाराम नलावडे याचा बंगला असुन त्या अळजापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत.
मगंळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंगल्यामध्ये असणाऱ्या बेडरुमचा दरवाज्याचा कडीकोयंडा कटावणीच्या साह्याने तोडुन गोदरेजच्या कपाटातुन एक मोठा गंठण, एक मिनी गंठण, एक अंगठी व कानातील फुले असे सोन्याचे दागिने व रोख रककम ५६ हजार रुपये असा एकुण २ लाख ७ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे करत आहेत.