प्रतिनिधी / सातारा
मंत्रालय मुंबई येथे कार्यरत असलेले अवर सचिव संतोष पराडकर हे कोल्हापूरहुन मुंबईला निघाले असताना शनिवारी रात्री 12.20च्या सुमारास आनेवाडी टोलनाका येथे फास्ट टॅग गाडीला असून ही टोलवरील फास्ट टॅग न चालल्याने दमदाटी करत कर्मचाऱ्यांने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखवून ही त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. याबाबत त्या अधिकाऱ्यांने रीतसर रस्ते प्राधिकरनाकडे तक्रार केली आहे.
आनेवाडी टोल नाक्यावर सतत वादावादी होत असते. शनिवारी सुट्टी घेऊन ड्युटीवर निघालेल्या अधिकारी पराडकर हे लेन क्रमांक 8 मधून जात होते. गाडीला फास्ट टॅग होता परंतु टोल व्यवस्थापनकडील मशीन ऍक्सेप्ट करत नसल्याने तेथील कर्मचारी हुज्जत घालू लागले. अगदी पराडकर यांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवले तरी दमदाटी केली. त्यावरून वातावरण तणावपूर्ण झाले होते. पराडकर यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात आले.