उदयनराजे यांच्यावतीने ऍड.तौफिक मणेर यांनी मांडली बाजू, सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मिलिंद पांडकर यांनी म्हणणे मांडले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एन गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी, पुढची सुनावणी 7/12ला
सातारा / प्रतिनिधी :
आनेवाडी टोल नाक्याच्या हस्तांतरण प्रकरणावरून खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात टोल नाक्यावर 6 ऑक्टोबर 2017 ला वाद झाला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने तत्कालीन भुईंज पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज खासदार उदयनराजे हे इतर सर्व कार्यकर्त्यांसह वाई न्यायालयात हजर झाले. त्या गुन्ह्याची सुनावणी वाईचे न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. उदयनराजे यांच्यावतीने ऍड.तौफिक मणेर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मिलिंद पांडकर यांनी म्हणणे मांडले. पुढील तारीख 7 डिसेंबर अशी देण्यात आली आहे.