गोडोली / प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारी संकटाला थोपवण्यासाठी राज्यात कडक दि.१ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू झाला आहे. याच दरम्यात आरटीओ कार्यालयाचे कामकाजाबाबत उप परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सुचनानुसार ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होणारे अर्जाचे सर्व परवाना कामकाज सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांबाबत कामकाज सुरू असेल तर नवीन आणि नुतणीकरण वाहनांच्या नोंदणी, परवाना कामकाज बंद राहणार आहे. मुदत संपणाऱ्या योग्यता प्रमाणपत्र, परवाना,लायन्सन, नोंदणी प्रमाणपत्रांना दि.३० जुन अखेर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरूण भारत’ शी बोलताना दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार उप परिवहन आयुक्तांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाबाबत सुचना दिल्या आहेत. त्यात दि.१ फेब्रुवारी २०२० नंतर मुदत संपणाऱ्या वाहनांचे परवाना,योग्यता प्रमाणपत्रे, लायन्सन,नोदणी प्रमाणपत्रांना दि.३० जून पर्यंत मुदत वाढ दिली आहे. नवीन वाहन नोंदणी,नवीन कोणताही वाहनविषयक अर्ज, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण, नोंदणी शिकाऊ आणि पक्के लायन्सन कामकाज बंद राहणार आहे. वाहन 4.0 प्रणालीवर फक्त ऑनलाईन नोंदणी पध्दतीने प्राप्त होणारे सर्व परवाना विषयक कामकाज सुरू राहणार आहे.
प्रलंबीत कामकाज कार्यालयीन स्तरावर सुरू असले.ज्यांनी लॉकडाऊन काळात कामकाजासाठी ऑनलॉईन पुर्वनियोजित वेळ घेतली असलेल्यांना पुन्हा कामकाज सुरूझाल्यानंतर फेर नियोजित कामकाजासाठी वेळ दिली जाणार असल्याचे विनोद चव्हाण यांनी
सांगितले.