प्रतिनिधी / सातारा
भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा विधानसभेतील भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मंजूर करून आणलेल्या कामामुळे त्यांचे अभिनंदन करत त्यांच्याशी चर्चा केली.
भाजपच्या नवीन पदाधिकारी निवडी नुकत्याच झाल्या आहेत. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुची निवासस्थानी करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार,उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, चिटणीस सुहास पोरे, सुनील जाधव, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, महिला मोर्च्या अध्यक्ष डॉ. सुरभी भोसले, अनुसूचित जाती मोर्च्या अध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. उत्कर्ष रेपाळ, व्यापारी आघाडी संयोजक डॉ. सचिन साळुंखे, उद्योग आघाडी संयोजक निलेश शहा. आरोग्यसेवा आघाडी संयोजक विवेक कदम या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांचे काससाठी आणि रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर करून आणल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. सातारा नगरपालिका हद्दवाढ, सातारा शहर आणि त्रिशंकू भागातले रस्ते आणि इतर समस्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी सातारा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, महिला मोर्च्या सातारा शहर अध्यक्ष रीना भणगे, व्यापार आघाडी जिल्हा सरचिटणीस मनीष महाडवाले, आयुश कांबळे, आदित्य कांबळे उपस्थित होते.