उपाध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे, श्रीकांत आंबेकर यांच्या नावाची चर्चा
खासदार उदयनराजे कोणाचे नाव घेणार ?
प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केले होते.सातारा विकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयानुसार एक वर्षा ऐवजी त्यांना मुदतवाढ मिळाली होती.आघाडीचे नेते उदयनराजे यांनी आदेश देताच उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांच्याकडे दिला गेला.उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज शेंडे, श्रीकांत आंबेकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून खासदार उदयनराजे हे कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.