वार्ताहर / कास
एकीव ता. जावली या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संगणकासह अन्य साहित्य चोरांनी केले लंपास. शिक्षक व ग्रामस्थांनी मेढा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन मेढा पोलिस निरिक्षक अमोल माने यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
जावली तालुक्याच्या डोंगरी भागामध्ये दर्जेदार शिक्षण देणारी व आय. एस. ओ. मानांकन प्राप्त असणाऱ्या एकीव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असुन या शाळेत संगणकांसह अन्य किमती वस्तु होत्या. लॉकडाऊनमुळे शाळाच उघडल्या नसल्याने शाळेकडे शिक्षक ग्रामस्थ व विदयार्थी यांचे दुर्लक्ष झाल्याने चोरट्यांनी डाव साधत एकीव शाळेच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडुन शाळेतील संगणक संच प्रिंटर, बॅटरी, टिव्ही संच, गॅस सिलेंडर आदी किमती व महत्वाच्या सहित्यांची चोरी झाल्याचे गुरूवारी सकाळी ग्रामस्थांच्या निर्दशनास आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ मेढा पोलिसांत लेखी तक्रार देत गुन्हा नोंद केला. चोरांचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शुक्रवारी मेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अमोल माने यांनी एकीव शाळेला भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास मेढा पोलिस करत आहे.