आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दिले निवेदन
प्रतिनिधी / सातारा
एसटी महा मंडळास अर्थ सहाय्य देऊन सक्षम करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन इंटकने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देऊन साकडे घातले आहे. विधी मंडळात आवाज उठवा अशी आर्जव केली आहे.
सातारा इंटकच्या वतीने एसटी बचाव कामगार बचाव निवेदन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देताना युवराज जाधव, कार्याध्यक्ष धनंजय जाधव, सचिव, धनपाल कांबळे, वैभव काळे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जुलै, ऑगस्ट या दोन महिन्याचे वेतन तात्काळ देण्यात यावे, महामंडळास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी लॉकडाऊन काळात झालेल्या आर्थिक नुकसान भरपाई पोटी तीन हजार कोटी देण्यात यावे, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, शासन निर्णयाप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्के व घर भाडे भत्ता देण्यात यावा, शासन निर्णयाप्रमाणे लॉक डाऊन काळात एसटी कर्मचाऱ्यांना हजेरी घेण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत.