कर्मचाऱयांच्या बेमुदत उपोषणामुळे गुरूवारी एकुण 1857 फेऱया रद्द : प्रवाश्यांचे आतोनात हाल
प्रतिनिधी /सातारा
अचानक पणे बंद पुकारलेल्या संपामुळे एस.टी महामंडळाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन सणादरम्यान कर्मचारी वर्गांनी पुकारलेल्या या उपोषणामुळे प्रवाश्यांना ही याचा आतोनात त्रास सहन करावा लागला होता. गुरूवारी जवळपास सर्वच एस.टी आगारात उभ्या ठाकल्या होत्या. त्यामुळे प्रवाश्यांना पर्यायी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागला होता.
सातारा आगारातील 1874 फेऱयां पैकी 1857 फेऱया रद्द झाल्या होत्या. 1 लाख 73 हजार 492.4 किलो मिटरवरचा प्रवास रद्द झाल्या होता. एकुण 50 लाख 22 हजार 605 रूपयांचे नुकसान झाले होते. बुधवार पेक्षा गुरूवारी अधिक प्रमाणात एसटी महामंडळाला नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
ऐन दीवाळी सणात पुकारलेल्या या उपोषणाचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाश्यांना मोठय़ा प्रमाणात होत आहे. कारण जवळपास सर्वच एस.टय़ा बंद असल्याने अनेकांना वडापचा आसरा घ्यावा लागला होता. त्यातच प्रवाश्यांची अडचन लक्षात घेता अनेक वडाप चालकांनी तर प्रवासी दरात वाढ केली होती. त्यामुळे नाईलाजास्तव अधिक दर देऊन प्रवाश्यांना वडापचा जीवघेणा प्रवास करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाश्यांकडून एस.टी प्रवास पुर्वरत व्हावा अशी मागणी करण्यात येत होती.
आंदोलनाला खासदार, आमदारांचा पाठिंबा
विविध प्रलंबीत मागण्यांसाठी एस.टी कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. गुरूवारीही हे उपोषण सुरूच होते. सातारा एस.टी विभातील सर्व कर्मचाऱयांनी या बेमुदत उपोषणात सहभाग दर्शविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुधवारपासुन सुरू करण्यात अलेल्या या उपोषणाला गुरूवारी खासदार छ. उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही पाठिंबा दर्शविला.