● 4 महिन्यांचे आकडे 20 दिवसात
● 260 जणांना डिस्चार्ज
● जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू
● गुरुवारी 337 बाधित
● पालकमंत्र्यांची प्रकृती सुधारली
● गुरुवारी आठ बाधितांचा मृत्यू
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्हय़ात कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असून सातारा जिल्हा हा संक्रमित जिल्हय़ात देशात पहिल्या दहामध्ये आहे. जिल्हय़ाचा पॉझिटिव्ह रेट वाढत चालला आहे. जुलैनंतर ऑगस्टमध्ये कोरोनाचे थैमान वेगाने वाढत चालले आहे. ऑगस्टच्या 20 दिवसांत अगोदरच्या चार महिन्यांची आकडेवारी कोरोनाने गाठल्याचे दिसत आहे. गुरूवारी जिल्हय़ात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात 260 नागरिकांनी कोरोना मुक्त होत कोरोनावर मात कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 337 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
ऑगस्ट महिन्यातील आकडय़ांनी धडकी
कोरोनाचा डबलिंगचा वेग वाढला आहे. 1 ऑगस्टला एकुण बाधित 4050, मुक्त 2036 तर बळी 134 होते. दहा दिवसांत यात बाधित 2732, मुक्त 1905 तर बळी 89 वाढले. 19 तारखेला एकुण बाधित 8671, मुक्त 4658 तर बळी 269 अशी आकडेवारी आहे. म्हणजेच गेल्या 20 दिवसांत 4621 जण कोरोना बाधित झाले आहेत. 2622 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 135 बळी गेले आहेत. कोरोनाचे पहिल्या चार महिन्यात असणारे आकडे ऑगस्टच्या 20 दिवसांतच दुप्पट झाले आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
‘तरूण भारत’चा अंदाज खरा ठरतोय
कोरोनाचे डबलिंग वाढल्याने जिल्हय़ात ऑगस्टअखेर कोरोना बाधितांचे एकुण आकडा 10 हजार तर कोरोनामुक्ती 5 हजाराच्या आसपास असेल, असा अंदाज तरूण भारतने वर्तवला होता. 20 तारखेची आकडेवारी पाहता ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात ही फिगर कोरोना गाठण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू
जिल्हय़ात गुरूवारी आठ बाधितांचा मृत्यू झाला. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे चौधरवाडी (ता. कोरेगाव) 75 वर्षीय पुरुष, सासपडे (ता. सातारा) येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी (ता. सातारा) 82 वर्षीय पुरुष या 4 कोरोना बाधितांचा तसेच सातारा विविध हॉस्पीटलमध्ये गजवडी (ता. सातारा) 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा 73 वर्षीय पुरुष व चिमणपूरा पेठ 35 वर्षीय पुरुष व कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये बनवडी (ता. कराड) 40 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कळविले आहे.
कराडात युवा व्यापाऱयाच्या मृत्यूने हळहळ
कराडातील युवा व्यापाऱयाचा कोल्हापूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या व्यापाऱयाचे बाजारपेठेत कपडय़ाचे दुकान आहे. या व्यापाऱयाने लॉकडाऊन काळात कराडची माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरिब, कष्टकरी कुटुंबांना धान्याची किट वाटली होती. युवा व्यापाऱयाच्या मृत्यूने कराड परिसरात हळहळ व्यक्त होत होती. पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
जिल्ह्यातील 260 जणांची कोरोनावर मात
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 260 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
जावली तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 33, खंडाळा तालुक्यातील 29, खटाव तालुक्यातील 16, कोरेगाव तालुक्यातील 34, महाबळेश्वर तालुक्यातील 10, पाटण तालुक्यातील 13, फलटण तालुक्यातील 27, सातारा तालुक्यातील 83, वाई तालुक्यातील 14 अशा एकुण 260 नागरिकांचा समावेश आहे.
681 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 19, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 91, उपजिल्हा रुग्णालय फलटण 33, कोरेगाव 14, वाई येथील 50, खंडाळा 46, रायगाव 58, मायणी 78, महाबळेश्वर 50, पानमळेवाडी 63, पाटण 8, दहिवडी 26, खावली 48 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 97 असे एकूण 681 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
पालकमंत्र्यांची प्रकृती सुधारली
जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मंगळवारी मुंबई येथील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केले आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध डॉ. ऊडवाडीया यांच्या निगराणीखाली साहेबांचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चांगली असून, औषधांची मात्रा कमी करण्यात आलेली आहे. प्रकृती औषधोपचारास चांगला प्रतिसाद देत असून, पालकमंत्री लवकरात लवकर पूर्ण बरे होवून, आपल्या सेवेत रूजू होतील, अशी माहिती त्यांचे सुपुत्र जशराज पाटील यांनी दिली.
बुधवारी रात्री 396 जणांचे अहवाल बाधित
जिह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बुद्रुक 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली 1, गिरीवाडी 1, गिरेवाडी 1, शिंदेवाडी 1, मल्हारपेठ 1, तळमावले 1, ढेबेवाडी 7.
कराड तालुक्यातील कराड सिटी पोलीस 3, शुक्रवार पेठ 1, कराड 7, काले 6, मलकापूर 9, चिखली 1, पोतले 1, नांदलापूर 1, आगाशिवनगर 1, बेलवडे 1, वडगाव 1, कोनेगाव 1, वाठार 11, महिगाव 2, सायगाव 1, बुधवार पेठ 2, कोयना वसाहत 3, बनवडी 6, कुंभारगाव 1, मुंडे 3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 5, शिवाजी हौसिंग सोसायटी 4, विडणी नवसारे 1, उंब्रज 1, मंगळवार पेठ 7, येळगाव 14, नवसारवाडी 1, पाडळी केसे 1, गुरुवार पेठ 8, कार्वे 1, सोमवार पेठ 2, सह्याद्री हॉस्पीटल 1,शिवडे 1, मार्केट यार्ड 1, येणके, खुबी 2
सातारा तालुक्यातील गुरुवारपेठ 2, नुने 1, शनिवार पेठ 13, प्रतिभा हॉस्पीटल 1, पाडळी 4, सातारा 9, यादोगोपाळ पेठ 2, नांदगाव 1, मालांज 1, वरणे 1, पिरवाडी 1, करंजे 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5, कृष्णानगर 1, अतित 1, सदरबझार 2, राधिका नर्सीग होम, शाहुपूरी 3, गडकरआळी 1, भरतगाववाडी 18, अतित 1, सुटकेस चौक एमआयडीसी 9, वाढे 1, धावडशी 2, मल्हारपेठ 5, दौलतनगर 1, नागठाणे 2, गोडोली 2,पुसेवाडी 2, गुजरआळी 2, विकासनगर 2, खिंडवाडी 2, लिंब 1, अंबेदरे 1, सातारा 8.
खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, चोराडे 1, विसापूर 1, खातगुण 2, डीस्कळ 4, वडूज 3, विखळे 1, भोसारे 2.
फलटण तालुक्यातील गोखळी 8, पवारवाडी 1, वेटने 2, गुणवरे 2, वाठार 1, महतपुरा पेठ 1, मंगळवार पेठ 1, कसबा पेठ 1, चौधरवाडी 2, धनगरवाडा 1, कृषीनगर 1, मटाचीवाडी 1, शुक्रवार पेठ 1, विडणी 1, ढेबेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, रवावार पेठ 2 , मलटण 4, दत्तनगर 8,
माण तालुक्यातील दहिवडी 2, महाबळेश्वरवाडी 5, म्हसवड 18, देवापूर 1, राणंद 1, तडवळे 1, वरकटे मलवडी 1, भालवडी 2, नरवणे 1.
कोरेगाव तालुक्यातील सोनके 1, कोरेगाव 1, किन्हई फाटा 1, सातारा रोड 1, पिंपोडे 1, कुमठे 1.
वाई तालुक्यातील शेंदूरजणे 2, रवावार पेठ 2, बोपर्डी 1, मधली आळी 1, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी, एमआयडीसी 1, पाचवड 2, कवठे 2, फुलेनगर1, रविवार पेठ 1, भुईंज 1, चिखली 1, सोनगिरीडी 2.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, फुलमळा 1, शिंदेवाडी 1, गवाडेवाडी 5, शेखमीरवाडी 1, वाडवाडी 1, पाडळी 1, पारगाव 1.
महाबळेश्वर तालुक्यातील गवळी मोहल्ला 1, महाबळेश्वर 5, राजवडी 1.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्गालय, लॅब, सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये कोरोना केअर सेंटर खावली 18, सातारा 2, केसकर कॉलनी 1, खटाव तालुक्यातील वडूज, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1, तळमावले 1, वाई 8, कराड तालुक्यातील बनवडी 5, कुंभारगाव 1, मलकापूर 7, मुंडे 3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 1, शिवाजी हौसिंग 4, वंडोली निलेश्वर 2, उंब्रज 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1.
बाहेरली जिह्यातील मंगरुळ कारवे जि. सांगली 1, खडगाव जि. सांगली 2, सोलापूर 1, सोनापूर जि. सोलापूर 1.
जिल्हय़ात गुरुवारी
एकुण बाधित 337
एकुण मुक्त 260
एकुण मृत्यू 08
जिल्हय़ात गुरुवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने 38026
एकुण बाधित 9008
घरी सोडण्यात आलेले 4918
मृत्यू 277
उपचारार्थ रुग्ण 4073