प्रतिनिधी/सातारा
जिल्ह्यात कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, घरात रहा सुरक्षित रहा असे आवाहन केले जात आहे. तरीही काही हुल्लडबाजी करणारे मौज मज्जा करायला कास पठारावर जात असतात. अशा वाहनांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कास पठार व परिसरात फिरण्या करता येणाऱ्या वाहनावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे 83 केसेस करुन 22,100रुपये तडजोड शुल्क वसूल केला आहे. तसेच यापुढेही अशाच प्रकारच्या सक्त कारवाई करण्यात येणार आहेत. तरी कोणीही विनाकारण कास पठार ठोसेघर परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ नये, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस नाईक सुहास पवार पोलीस कॉ.भोडंवे, पोलीस कॉ,विक्रम हासबे यांनी केली.