वार्ताहर / कास
कास पठार वनसमितीच्या कर्मचाऱ्यांनी जखमी भेकराला जीवदान दिले. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील कात्रज वन्यप्राणी उद्यानात रविवारी दाखल करण्यात आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार परिसरात वन्यप्राण्यांचे दर्शन वारंवार स्थानिक व पर्यटकांना होत असते. शनिवारी रात्री वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत कास पठार वनसमितीचे पथक गस्त घालण्यासाठी गेले होते. कास तलावाकडे जाताना वाहन पार्किंग तळाशेजारी डांबरी रोडलगत जखमी अवस्थेत पडलेले रानटी भेकर त्यांना दिसून आले. प्राथमिक उपचारादरम्यान त्याचा पुढील पाय फॅक्चर झाल्याचे आढळुन आले त्यामुळे टिमने तात्काळ त्या जखमी भेकराला पठारवरील वनसमितीच्या केबीनमध्ये आणले व वनविभागाच्या वरिष्ठ आधिकऱ्यांना ही माहिती देऊन पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून रविवारी त्याच्यावर उपचार केले.
पुढील उपचारासाठी वनसमितीच्या वाहनातून त्याला कात्रज येथील वन्यप्राण्याच्या उद्यानात पाठविण्यात आले. या बेकराच्या बचावकार्याच्या मोहीमेत जावली वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक निलेश रजपुत, अर्जुन चव्हाण, वनसमीतीचे अध्यक्ष बजरंग कदम, सोमनाथ जाधव, विठ्ठल कदम, भगवान आखाडे, गणेश आटाळे, महेश कदम, अंकुश आहिरे, आभिषेक शेलार, प्रदीप शिंदे, योगेश काळे, विजय बादापुरे आदींचा सहभाग घेतला होता.