सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कृषी अधिकारी विनायक पवार यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली. पवार यांच्या सरप्राईज व्हिजिटमुळे कृषी विभागातील इतर कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. काही जण न सांगता कार्यालयाबाहेर गेले होते, त्यांना नोटीस काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पवार यांनी घेतलेल्या सरप्राईज व्हिजिट व पाहणीची कृषी विभागात चर्चा सुरू होती.