प्रतिनिधी / सातारा
श्री बालाजी ट्रस्ट च्या माध्यमातून उभारलेल्या कैलास स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सालाबादप्रमाणे दिवाळीचा बोनस (एक पगार) श्री दिपकजी प्रभावळकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बालाजी ट्रस्ट चे संस्थापक राजेंद्र चोरगे, जगदीश खंडेलवाल, नितीन माने, जगदिप शिंदे, सचीन भोसले व ७ कर्मचारी उपस्थितीत होते.
यावेळी दिपकजी प्रभावळकर म्हणाले की, गेली १७ वर्ष हे कर्मचारी स्मशानभूमीत सेवा करीत आहेत, पण विशेष म्हणजे कोरोनाच्या गंभीर संकटाच्या काळात सुद्धा अहोरात्र या ७ जणांनी न घाबरता काम केले हे फार अतुलनीय कार्य आहे. यामुळे श्री बालाजी ट्रस्टला सातारकर कधीच विसरू शकत नाहीत. एवढे बोलून सर्व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.