वाठार किरोली / वार्ताहर :
कोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल प्रक्रिया योग्य नियोजनामुळे व्यवस्थित पार पडली. कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०२० अंतर्गत दि. २३ डिसेंबर ते दि. ३० डिसेंबर कालावधीमध्ये उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया इनडोअर स्पोर्टस हॉल डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव येथे एकाच जागेवर पार पडली.
प्रशस्त जागा असल्याने सोशल डिस्टन्स पाळून उमेदवारांना नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी कोणताही त्रास न होता राज्य निवडणूक आयोगाचे पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार कोरेगाव अमोल कदम यांनी चांगली सोय केल्याबद्दल सर्व उमेदवार आणि ग्रामस्थांकडून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच कोरेगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. तसेच सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबविली .