प्रतिनिधी/ सातारा
सातारा ते कोरेगाव जाणाऱया रस्त्यावर महागावच्या हद्दीत झालेल्या अपघाताला कारण ठरलेल्याने कार चालक अविनाश रामचंद्र निकम (रा. चिंधवली, ता. वाई) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनिल तात्यासो चव्हाण (रा. वेळेकामथी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संशयित अविनाश निकम हा दि. 12 रोजी त्याच्या ताब्यातील स्विफ्ट (एमएच 11 एके 2826) ही कार घेऊन कोरेगावच्या दिशेने निघाला होता. यावेळी महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत अविनाश निकम याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार चालवत चुकीच्या दिशेला कार नेली व समोरून येणाऱया (एम. एच. 11 बीव्ही 8568) या कारला जोराची धडक दिली.
या अपघातात फिर्यादीच्या गाडीचे नुकसान झाले असून कार चालवणारा त्यांचा मुलगा अभय चव्हाण हा जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या अपघाताचा पुढील तपास हवालदार कराळे हे करत आहेत.