सातारा / प्रतिनिधी
सातार्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपूर्वी वॉर्ड क्रमांक 5 च्या शौचालयात दोन मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे अगोदरच वाभाडे निघत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ती मृत अर्भक कोणाची?, याचा तपास करण्यात यावा, जिल्हा रुग्णालयावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात सध्या कोव्हिडंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत.तरीही सर्वसामान्य गोरगरीब रुग्णाचा आधार म्हणून या रुग्णालयाकडे पाहिले जाते.गर्भवती महिलांवर येथे उपचार केले जातात.प्रसूती उपचार केले जातात.वॉर्ड नंबर 5 मधील शौचालय चौकअप झाल्याने स्वच्छता करण्यासाठी कामगार गेला होता.तेव्हा शौचालयात रक्तामासांचा गोळा निदर्शनास आला. त्या कर्मचाऱ्यांने तो गोळा हँडग्लोज व तोंडाला मास्क लावून काढला.तो गोळा काढताच आणखी एक तसाच रक्तामासांचा गोळा असल्याचे आढळून येताच तो ही काढला.हे दोन्हीही मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडायला उशीर लागला असून हे मृत अर्भक कोणाचे, याबाबत उलटसुलट चर्चा असून ज्याने कोणी हे काम केले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.