सातारा/प्रतिनिधी
सातारा येथील क्षेत्र माहुली येथे एका युवकाचा डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. अभिजित मोहिरे (वय 32) असे या मृत युवकाचे नाव आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.