सातारा / प्रतिनिधी :
सातारा येथे जलमंदिर पॅलेसवर भाजपचे खासदार, माजी मंत्री गिरीश बापट यांनी आज सकाळी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. बापट आणि उदयनराजे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.