उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे तक्रार
सातारा / प्रतिनिधी :
त्रिमूर्ती कॉलनीतील गटाराचे पाणी गोळीबार मैदानाच्या मुख्य रस्त्यावर सोडले आहे. तसेच घंटागाडी व स्ट्रीट लाईट सुरू करण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन गोळीबार मैदान परिसर विकास सेवा संस्थेने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिले.
यावेळी प्रा.अरविंद खराड, निवृत्ती रोकडे, दिलीप वाघमारे, बुवा सूर्यवंशी, विलास शिंदे, संदीप भोसले, धनेश खुडे, सुयश धनसरे, प्रथमेश खोपडे आदी उपस्थित होते.