सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन खासदार उदयनराजे यांनी करून अनपेक्षित धक्का दिला आहे. मात्र, आता प्रजासत्ताक दिनाला शासकीय उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते. त्या अनुषंगाने तयारी म्हणून दिशादर्शक बोर्ड लावण्याचे काम आज युद्ध पातळीवर सुरू होते.