प्रतिनिधी / सातारा
येथील गांधी मैदानावर भरत असलेली चौपाटी आता आळूच्या खड्डयात चालली आहे. त्यासाठी आज पालिकेच्यावतीने मोजमापे सुरू होती. पालिकेचे अधिकारी मोजमाप घेत होती. मात्र, ज्यांचे नाव पालिकेच्या यादीत नाही पण हॉकर्स म्हणून नेत्यांच्या बगलबच्यांकडे पावशेर आहे त्यांचेच नाव या आकाआकीत पुढे असल्याने यामध्ये चौपाटी बसवण्यापूर्वीच गोलमाल सुरू झाला आहे. हॉकर्स संघटनेचे नेते ही त्या बगलबच्याना मिळाले असून यामुळे नोंदणीकृत हॉकर्सना जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.
अलीकडच्या काही वर्षांपासून राजवाडा येथील गांधी मैदानावर चौपाटी भरते. येथे 70 हुन अधिक स्टोल, हातगाडे आहेत. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या पाठीमागच्या कार्यकाळात नागरिकांच्या मागणीनुसार ही चौपाटी हलवण्याचा निर्णय झाला होता. आता पुन्हा त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, नव्याने बसवण्यात येणाऱ्या आळूच्या खड्यातल्या चौपाटीचे आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आखणी केली. येथे जे विक्रेते नोंदणी नाहीत त्यांनाच येथे जागा देण्याची खटपट जे काही कार्यकर्ते सतत नेत्यांच्या समवेत असतात त्यांच्याकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून सुरू आहे. त्यामुळे नव्याने चौपाटी वसवताना नेत्यांचे बगलबच्चे गब्बर होणार असून जे मूळ नोंदणीकृत हॉकर्स आहेत त्यांना मात्र पुन्हा जागेसाठी वणवण करावे लागणार आहे. दरम्यान, सातारा शहर हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी यांचीही या बगलबच्याशी मिलीभगत असल्याने नोंदणीकृत हॉकर्सच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.