प्रतिनिधी/नागठाणे
न्यायालयाच्या आदेशाने जमीन वहिवटत असतानाही अनाधिकाराने जमिनीत प्रवेश करून वहिवटण्यास मज्जाव करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भाटमरळी (ता.सातारा) येथील पाचजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदकुमार गोविंद अवघडे, मयूर नंदकुमार अवघडे,पिंटू गोपाळ अवघडे,केशव मोहन अडागळे व तुषार आप्पा माने ( सर्व रा.भाटमरळी, ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश शंकर गायकवाड ( रा.भाटमरळी, हल्ली रा.फुलेवाडी, कोल्हापूर) यांची भाटमरळी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ते कोल्हापूर येथून येऊन-जाऊन जमिन कसत आहेत. ही जमीन देवस्थान असून या जमिनिशेजारील नंदकुमार अवघडे यांच्याशी वाद होता. हा वाद कोर्टातही गेला होता. कोर्टांने विरोधकांना कोणताही अडथळा करू नये अशी ताकीद दिली होती. कोर्टात या वादाचा निकाल प्रकाश गायकवाड यांच्या बाजूने झाला होता.न्यायालयाच्या आदेशाने ते ही जमीन वहिवटत होते.
काही दिवसांपूर्वी विरोधक नंदकुमार अवघडे, मयूर अवघडे, पिंटू अवघडे, केशव अडागळे व तुषार माने यांनी कोरोना साथरोगामुळे प्रकाश गायकवाड भाटमरळी येथे येऊ शकत नसल्याचा फायदा घेत गायकवाड यांचा मेहनतदार महेश जाधव यांना दमदाटी देत अडथळा केला. व बळजबरीने जमिनीची नांगरट केली करून पेरणी केली.त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.
Previous Articleकर्नाटकचे उपमुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.