कुडाळ / प्रतिनिधी :
जावली तालुक्यातील सहा वर्षीय मुलीवर वर्षभर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 4 जणांना मेढा पोलिसांनी अटक केली आहे.
रामचंद्र कोंडीबा सुतार, अनिकेत रामचंद्र सुतार, लक्ष्मण कोंडिबा सुतार, साहिल राजू ओंबळे, रवींद्र विश्वनाथ ओंबळे, अनिकेत उर्फ निखिल राजू ओंबळे (सर्वजण रा. केडंबे, ता. जावली) या सहा जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील चौघांना मेढा पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीला खेळण्यासाठी व खाऊ देण्यासाठी घरातून बोलवून घेत आरोपींनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार एप्रिल 2020 पासून सुरू होता. अखेर या मुलीने कुटुंबियांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी मेढा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने अधिक तपास करत आहेत.