प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हय़ात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून कोरोनाचाही जोर वाढला आहे. मंगळवारी रात्री 220 इतका बाधितांचा आकडा वाढला आहे. गेले पंधरा दिवस शासकीय यंत्रणेची दमछाक करणारे ठरले असून बाधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. त्याबरोबरच गेल्या पंधरा दिवसांत 70 जणांचा मृत्यू झाला यात बुधवारचे 5 आहेत. मृत्यूचे हे प्रमाणही दुप्पट झाले आहे. बुधवारी 62 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी रात्री 196 जणांचे रिपोर्ट बाधित आल्याने एकूण रुग्ण संख्या 4 हजार976 इतकी झाली आहे.
*20 जुलै ते 5 ऑगस्ट*
प्रशासकीय यंत्रणा जुलै महिन्यात जास्त काळजी घेण्याचे आवाहन करत होते. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पावसाळा आणि हवामान बदलल्याने सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. निकट सहवासितांमध्ये संसर्ग वाढला. परिणामी 20 जुलै ते 5 ऑगस्ट या पंधरा दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव दुप्पट झाला आहे. 20 जुलै एकुण बाधितांचा आकडा 2459 इतका होता. त्यात गेल्या 15 दिवसांत दुप्पट म्हणजे 2517 ने वाढ होऊन तो 4976 इतका झाला आहे. म्हणजेच जुलै महिन्यात कोरोनाचे थैमान वाढल्याचे दिसत आहे.
रूग्णवाढ होत असताना मुक्त होण्याचे प्रमाण तितकेसे वाढलेले नाही. 20 जुलैला 1370 इतके मुक्तांचे प्रमाण होते. त्यात 979 ने वाढ होऊन मुक्तांचे प्रमाण 2349 इतके झाले आहे. 20 जुलैला उपचारात असणारे रूग्ण 1004 होते. त्यात पंधरा दिवसांत 1339 वाढ होऊन ऍक्टिव्ह रूग्णसंख्या 2343 इतकी झाली आहे. म्हणजेच पंधरा दिवसांत हा आकडा जवळजवळ दुप्पट झाला आहे. तर पंधरा दिवसांत 70 बळी गेले असून पूर्वीचे 85 धरून एकुण बळी 155 झाले आहेत. ही आकडेवारी पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसत असून लोकांनी अधिक सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.
*5 बाधितांचा मृत्यू*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे औंध ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 72 वर्षीय पुरुष, निसरे ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष या 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. तर कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठेतील कोरोनाबाधित 62 वर्षीय पुरुषाचा व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतलेल्या खटाव येथील कोरोनाबाधित 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहेत. त्यांचे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल हे कोरोनाबाधित आले आहेत.
*62 नागरिकांना घरी सोडले*
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले.
*कराड* तालुक्यातील कापील येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, कालवडे येथील 30 वर्षीय महिला, खंडोबानगर (मलकापूर) येथील 4 वर्षीय बालक, वडगाव हवेली येथील 43 वर्षीय पुरुष.
*पाटण* तालुक्यातील नेरळे येथील 23 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 12, 17 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला, निगडे येथील 45 वर्षीय पुरुष.
*वाई* तालुक्यातील वेळे येथील 40 वर्षीय महिला.
*सातारा* तालुक्यातील कण्हेर येथील वय 22, 40, 40, 34, 90, 40, 25, 62, 30, 54, 18,40, 37 वर्षीय महिला व वय 51, 50, 40, 56, 55, 7, 22, 11, 36, 5, 57, 16, 12, 16, 65 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 44 वर्षीय महिला, लक्ष्मी टेकडी येथील वय 56, 18, 7, 42 वर्षीय महिला व वय 42, 35 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 44, 20, 42 वर्षीय महिला व 47, 19, 38,54 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षीय बालक, प्रतापगंज पेठेतील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 29 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष,
*महाबळेश्वर* तालुक्यातील गोडवली येथील 23, 38 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष.
*जावली* तालुक्यातील सायगाव येथील 36 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला.
*फलटण* तालुक्यातील फलटण शहरातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष यांना घरी सोडण्यात आले.
*450 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 32, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 86, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 30, कोरेगांव 4, वाई येथील 29, खंडाळा येथील 80, पानमळेवाडी 21, महाबळेश्वर 6, पाटण 13, दहिवडी 36, खावली 55, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 58 असे एकूण 450 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
*मंगळवारी रात्री जिह्यातील 220 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह*
जिह्यात काल मंगळवारी रात्री 220 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिह्यात काल मंगळवारी रात्री 220 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*कराड तालुक्यात स्थिती गंभीर*
कराड तालुक्यात प्रादुर्भावाची स्थिती गंभीर आहे. मंगळवारी बाधितांचा आकडा या तालुक्यात एक हजाराच्या पुढे गेला आहे. जिल्हा पाच हजार ओलांडत असताना त्यातील एक हजार रूग्ण एकटय़ा कराड तालुक्यात आहेत. तालुक्यातील 100 गावांना कोरोनाने फटका दिला आहे. मंगळवारी रात्रीच्या अहवालात येथे 72 रूग्ण आढळले आहेत. यात तालुका 47 तर कराड शहर 25 अशी स्थिती आहे.
*जिल्हय़ात बुधवारपर्यंत*
एकुण बाधित 4976
एकुण मुक्त 2349
एकुण बळी 152
उपचारार्थ रूग्ण 2475
.