प्रतिनिधी / सातारा :
जिह्यातील दोन जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामधील संतोष मोहिते यांनी आत्मदहनाचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांनी समजूत घालून सोडून दिले.
संतोष मोहिते यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताना पोलिसांनी रोखून धरत त्यांना अटकाव केला. मोहिते यांनी दिलेल्या निवेदनानुसार शिरवळ येथील गट नंबर 1319/1 मंजूर रेखाकंनाप्रमाणे सुधारित इमारत बांधकाम आराखडय़ास मंजूरी मिळण्याबाबतच्या प्रकरणामध्ये तात्कालिन लिपीक संतोष गुल्हाणे यांच्या विरोधात विभागीय चौकशी कारवाई दि.12 जून 2019 रोजी सुरु करण्यात आली होती. विभागीय चौकशीची सुनावणीची कारवाई संपलेली असून विभागीय चौकशी ही अंतिम निर्णय घेण्यात प्रलंबीत आहे. असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले. त्याबाबत अंतिम निर्णय होत नाही आणि दोषी असणाऱया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून आत्मदहन करण्याचा मोहिते यांनी इशारा दिला होता. त्यानुसार मोहिते यांनी आंदोलन केले. परंतु त्यांनी मागच्या दाराने येवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रॉकेलची बाटली खिशातून काढताना पोलिसांनी ताब्यात घेतले अन् रोखले.