प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने पंचसुत्री ही योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. त्याबाबत सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांचा राज्याचे उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी कौतुकांची थाप देण्यात आली.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले, सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या विश्वासावरच शासनाचा गाडा सुरु आहे. त्यामुळे जबाबदारीने काम करावे. काही अडचण आल्यास महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना भेटावे. परंतु तुम्हाला दिलेल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास गय केली जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.