टेक्नोसॅव्ही शिक्षकांचा समावेश, दोन्ही वर्षाचे एकदम होणार पुरस्कार वितरण
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले असून गतवर्षी आणि यावर्षीचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान शिक्षक दिनी करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली. दरम्यान, आदर्श शिक्षक पुरस्काराने यावर्षी टेक्नोसॅव्ही शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
गतवर्षी कोरोनामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते मात्र त्याचे वितरण करण्यात आले नव्हते. तसेच यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये बसप्पाचीवाडी शाळेचे प्रवीण क्षीरसागर, कामेरी शाळेचे धनाजी कातंगळे, मांडवे शाळेचे कुंडलिक जगदाळे, शेरे शाळेचे प्रदीप कुंभार, कवठे शाळेच्या नलिनी बैले, चव्हाणवाडी शाळेचे दादासाहेब गायकवाड, वेखंडवाडी शाळेचे प्रल्हाद पवार, खटकेवस्ती शाळेचे लालासो पवार, दऱ्याचीवाडी शाळेच्या करुणा मोहिते, कुळकजाई शाळेचे वसंत जगदाळे, वडगाव शाळेचे संजय खरात, रानमळा शाळेच्या वैशाली खाडे, कण्हेरखेड शाळेचे अकबर मुलाणी, जवळवाडी शाळेचे शांताराम ओंबळे, गवडी शाळेच्या मंगल पिसाळ, भिलार शाळेचे विजय भोसले, शिंदेवाडी शाळेच्या प्रतिभा सूर्यकांत भांडे-पाटील, मळाईवस्ती शाळेच्या भारती रामगुडे, वेटणे शाळेचे अजित चव्हाण, साळुंखेमळा शाळेचे हसन शेख, मांडवे शाळेचे जयकर खाडे, वेळे शाळेच्या संजीवनी बुळुंगे, शेंदूरजणे शाळेच्या राजश्री पोतदार यांना जाहीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पुरस्कार वितरण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दि.6 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत असणार आहेत.