प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने पदोन्नतीची प्रक्रिया आज मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी 32 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
वरिष्ष्ठ सहायकमधून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून 5 जणांची पदोन्नती, कनिष्ठ सहायकमधून वरिष्ठ सहायक 10, परिचरमधून कनिष्ठ सहायक पदावर 17 जणांची पदोन्नती करण्यात आली. त्यांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात आले.